ई-निविदा सूचना क्र.रामविसं – १/२०२६-२७
(बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून ई-निविदा मागविण्याबाबत)
राज्य मराठी विकास संस्था, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३,महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई-४००००१ यांच्या कार्यालयासाठी ‘जिल्हा मराठी भाषा विकास कक्ष’ या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी बाह्यस्रोताद्वारे कुशल-अकुशल मनुष्यबळ पुरवठा करण्याकरिता दोन लिफाफा पद्धतीने मनुष्यबळ पुरविणाऱ्या इच्छुक नोंदणीकृत व अनुभवी निविदाकाराकडून ई-निविदा मागविण्यात येत आहेत.
ई-निविदेत भाग घेण्यासाठी त्याबाबतची तपशीलवार जाहिरात, ई-निविदा भरण्यासाठी अटी व शर्ती शासनाच्या https://gem.gov.in व राज्य मराठी विकास संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर ई-निविदा शासनाच्या जेम पोर्टलवर (GEM Portal) भरावयाची आहे.
सदर ई-निविदा सादर करण्याचा कालावधी दि. ०३.०७.०२६ ते दि. २०.०७.२०२६ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत असेल.
कोणतेही कारण न देता सदरची ई-निविदा रद्द करण्याचे अधिकार संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचेकडे राहतील.
ई-निविदा_१/२०२६-२७_जि.म.भा.वि.क.