आजवर प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांपैकी ज्यांच्या स्वामित्व हक्काची मुदत संपली आहे असे मराठी भाषेतील दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिके ह्यांचे संगणककीकरण करून ते महाजालावरून लोकांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशी सूचना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि समाजजीवन ह्यासंदर्भातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने मराठीतील दुर्मिळ पुस्तके आणि नियतकालिके ह्यांचे संगणकीकरण (डिजिटायजेशन) करून ते जनतेला उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प संस्था राबवत आहे.

आजवर १२९ पुस्तके आणि ५५५ नियतकालिके यांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून ही सामग्री संस्थेच्या संकेतस्थळावरून (https://rmvs.marathi.gov.in/books) उतरवून घेता येते. उर्वरित ग्रंथांच्या/ नियतकालिकांच्या संगणकीकरणाचे काम चालू असून तेही संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.

This Post Has One Comment

  1. श्री. संतोषकुमार शंकरराव पवार

    स्त्युत्य उपक्रम आहे..

अभिप्राय द्यायला विसरू नका!