कृष्णाकाठआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मराठी भाषेच्या विविधांगी विकासासाठी स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी विविध उपक्रम राबवले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाची स्थापना तसेच मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा प्रारंभही त्यांच्याच प्रेरणेने झाली. स्व. यशवंतरावजी हे केवळ राजकारणीच नव्हते तर ते साहित्यप्रेमी आणि रसिकही होते. त्यांनी उत्तम साहित्यनिर्मितीही केली आहे. त्यांनी आपले आत्मचरित्र तीन खंडात लिहिण्याचे योजले होते. त्यांपैकी कृष्णाकाठ हा पहिला खंडच ते पूर्ण करू शकले. स्व.यशवंतरावांची विलक्षण प्रतिभा व भाषेवरील प्रभुत्व या आत्मचरित्रात दिसून येते. साधारणत: १९४६ पासून १९८४ पर्यंत यशवंतरावांनी आपली जडणघडण कशी झाली, आपल्या एकंदर वाटचालीत कुटुंब,निकटवर्तीय,आपल्यावर पडलेला विविध व्यक्तींचा प्रभाव तसेच सहवासात आलेल्या व्यक्ती, नेते मंडळी, कार्यकर्ते आदींच्या योगदानाची माहिती आत्मचरित्रात दिली आहे. स्व. यशवंतरावजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून हे आत्मचरित्र श्राव्य पुस्तकाच्या स्वरूपात इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ह्या पुस्तकाचे श्राव्य पुस्तकात रूपांतर करण्यासाठी सचिव, वेणुताई चव्हाण ट्रस्ट ह्यांनी अनुमती दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या श्राव्य पुस्तकांचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून ही पुस्तके जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कृष्णाकाठ
डाऊनलोड

अभिप्राय द्यायला विसरू नका!