नियामक मंडळ – नियामक मंडळाची रचना

संस्थेचे कामकाज तिच्या नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. हे नियामक मंडळ पदसिद्ध सदस्य व अशासकीय सदस्य यांचे मिळून बनलेले असते. त्याची रचना पुढीलप्रमाणे आहे. संस्थेचे संचालक हे नियामक मंडळाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. याशिवाय, पुढील यादीमध्ये समावेश नसलेल्या परंतु मराठीच्या अभिवृद्धीसाठी सहभाग आवश्यक असलेल्या व्यक्तीनांही नियामक मंडळाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करता येते. मात्र अशा व्यक्तींची संख्या पाचपेक्षा अधिक नसते. अ.भा. मराठी साहित्य विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनांचे अध्यक्ष हे विशेष निमंत्रित सदस्य असताना आणि इतर प्रवाहांना सामील करुन घ्यावयाचे असेल तेव्हा उरलेल्या दोन पदांसाठी त्यांचा विचार करण्यात येतो. या सदस्यांची नियुक्ती शासन आवश्यकतेनुसार करते.

पदसिद्ध सदस्य

 • अध्यक्ष – मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
 • उपाध्यक्ष – मा. मंत्री, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य
 • सदस्य – मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
 • सदस्य – अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मराठी भाषा विभाग
 • सदस्य – अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, शालेय शिक्षण
 • सदस्य – अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,माहिती तंत्रज्ञान
 • सदस्य – संचालक, आदिवासी संशोधन व विकास संस्था, पुणे
 • सदस्य – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
 • सदस्य – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ
 • सदस्य – संचालक, भाषा संचालनालय
 • सदस्य सचिव – संचालक, राज्य मराठी विकास संस्था

सध्या अस्तित्वात असणाऱ्या नियामक मंडळातील अशासकीय सदस्य:

 • अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
 • भाषाविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – डॉ. मिलिंद मालशे
 • मराठी साहित्यक्षेत्रातील ललित लेखक – श्री वसंत आबाजी डहाके
 • मराठी साहित्यक्षेत्रातील ललित लेखक – श्रीमती. सिसिलिआ कार्व्हलो
 • उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती – श्री. सुशांत नाईक
 • तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – श्री. अच्युत गोडबोले
 • कृषिविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – श्री. ना. धों. महानोर
 • महाराष्ट्राबाहेरील मराठीच्या प्राध्यापकांचा प्रतिनिधी – श्रीमती शोभा नाईक
 • शिक्षणशास्र क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – श्री. हेरंब कुलकर्णी
 • प्रसारमाध्यम प्रतिनिधी – श्री. संजय डहाळे
 • मराठी साहित्यक्षेत्रातील समीक्षक – श्री. अविनाश कोल्हे
 • महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या मराठी विभागाचा प्रतिनिधी – डॉ. प्रमोद मुनघाटे
 • मराठीच्या विकासाचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी संस्थांचा एक प्रतिनिधी – श्री. सुनिल वेलणकर
 • मराठीच्या विकासाचे काम करणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्थांचा एक प्रतिनिधी – डॉ. भालचंद्र शिंदे
 • मराठीच्या विकासाचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी संस्थांचा एक प्रतिनिधी – श्रीमती नमिता कौर
 • भाषाविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – डॉ. कल्याणी दिवेकर
 • लोकसंस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – डॉ. गणेश चंदनशिवे
 • औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – डॉ. गुरूनाथ पंडीत
 • महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापार, व्यवस्थापक यांचा एक प्रतिनिधी – श्री. प्रशांत गिरबाने
 • रंगभूमी, प्रयोगकला व चित्रपट यांचा एक प्रतिनिधी – श्री. सुदेश भोसले
 • बृहन्महाराष्ट्र परिषदेने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी – श्रीमंत शिवाजीराजे भोसले
 • जागतिक मराठी परिषदेचा प्रतिनिधी – श्रीमती रेखा दिघे
 • रंगभूमी, प्रयोगशाळा व चित्रपट यांचा एक प्रतिनिधी – प्रा. शफाहत खान
 • भाषाविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – प्रा. रावसाहेब काळे
 • भाषाविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – डॉ. सतिश बडवे
 • लोकसंस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती – डॉ. मधुकर वाकोडे
 • मराठीच्या विकासाचे काम करणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्थांचा एक प्रतिनिधी – श्री. नारायण कापोलकर