‘बृहन्महाराष्ट्रातील संस्था / मंडळांना  अर्थसाहाय्य योजना’ सन २०२५-२६

आवाहन

महाराष्ट्र राज्याने २०१० साली स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील प्रकरण ४ “भाषा आणि साहित्य” याअंतर्गत – बृहन्महाराष्ट्र या विभागात बृहन्महाराष्ट्रातील मंडळांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘बृहन्महाराष्ट्रातील संस्था/ मंडळांना अर्थसाहाय्य योजना’ राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.

‘महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या मान्यता प्राप्त संस्था / मंडळांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल.’

राज्य मराठी विकास संस्थेने या योजनेअंतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्था / मंडळांना रु. ५०.०० लक्ष (प्रत्येकी रु. २.०० लक्षच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी पात्र संस्था/मंडळांकडून  दिनांक १०/०७/२०२५ ते १०/०८/२०२५ या विहित कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसंदर्भातील कार्यपद्धती व निकष, बृहन्महाराष्ट्रातील मंडळे यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना,  इतर तपशील विहित नमुन्यात गुगल अर्ज (Google Form) राज्य मराठी विकास  संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या व महाराष्ट्र शासनाच्या http://maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळांवर ‘नवीन संदेश’ या सदरात बृहन्महाराष्ट्रातील संस्था/ मंडळांन अर्थसाहाय्य योजना२०२५-२६  या  शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सदर अर्थसाहाय्याचे गुगल अर्ज (Google Form) विहित नमुन्यात व विहित कालावधीत दि. १०/०७/२०२५ ते १०/०८/२०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अंतिम तारखेच्या कालमर्यादेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

महाराष्ट्र राज्याबाहेरील बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त मंडळे तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांना सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

‘बृहन्महाराष्ट्रातील संस्था / मंडळांना अर्थसाहाय्य योजना’ सन २०२५-२६ – गुगल अर्ज 

खालील बटणावर क्लिक करून आवाहन, अटी व शर्तींबाबतची धारिका (File) डाऊनलोड (Download) करावी.

आवाहन, अटी व शर्ती

अभिप्राय द्यायला विसरू नका!