महाजालावर आणि संगणकावर युनिकोड ही संकेतप्रणाली वापरून मराठीचा वापर वाढत असला तरी संगणकाच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी टंक संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेल्या दिनांक ६ नोव्हेंबर २००९ च्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निकषांप्रमाणे नसल्यामुळे या शासन निर्णयांतील निकषांशी जुळतील असे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी टंक तयार करून घेऊन ते जनतेला मुक्त ( फ्री ॲण्ड ओपन सोर्स ) परवान्यांतर्गत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यांपैकी दोन टंकांचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ ह्या दोन टंकांना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत.

महाजालावर आणि संगणकावर युनिकोड ही संकेतप्रणाली वापरून मराठीचा वापर वाढत असला तरी संगणकाच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी टंक संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेल्या दिनांक ६ नोव्हेंबर २००९ च्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निकषांप्रमाणे नसल्यामुळे या शासन निर्णयांतील निकषांशी जुळतील असे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी टंक तयार करून घेऊन ते जनतेला मुक्त ( फ्री ॲण्ड ओपन सोर्स ) परवान्यांतर्गत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ ह्या दोन टंकांना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत.
हे टंक तसेच त्यांची स्रोतसामग्री (सोर्स) ह्या गोष्टी गिटलॅब ह्या संग्राहिकेतून (रिपॉझिटरीतून) उतरवून घेता येतील

यशोमुद्रा टंक – https://gitlab.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashomudra/-/releases
यशोमुद्रा टंकाची स्रोतसामग्री – https://gitlab.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashomudra
यशोवेणू टंक – https://gitlab.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashovenu/-/releases
यशोवेणू टंकाची स्रोतसामग्री – https://gitlab.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashovenu

युनिकोड आधारित मराठी मुक्त (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) टंक
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण ह्यांच्या स्मृत्यर्थ यशोमुद्रा आणि यशोवेणू ह्या युनिकोड आधारित मराठी मुक्त (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) टंकांचे लोकार्पण करताना राज्य मराठी विकास संस्थेला आनंद होत आहे.

सदर टंकांची वैशिष्ट्ये

हे टंक युनिकोड ७.० ह्या अद्ययावत प्रमाणकावर तसेच महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसृत केलेल्या वर्णमाला आणि वर्णलिपीविषयक शासननिर्णयावर आधारलेले आहेत.
प्रत्येक टंकात हलका (लाइट), साधा (नॉर्मल), मध्यम (मिडियम), निमठळक (सेमीबोल्ड) आणि ठळक (बोल्ड) अशी ५ वजने आहेत. प्रत्येक वजनाच्या सरळ आणि तिरपा (इटॅलिक) अशा २ शैली आहेत.
यशोमुद्रा हा टंक बोरूने काढल्याप्रमाणे पारंपरिक वळणाचा तर यशोवेणू हा टंक समरेखा म्हणजे रेघेची जाडी सर्वत्र समान असणारा आहे. ह्या दोन्ही टंकांतील अक्षराकारांची रुंदी जवळपास समान असल्याने मांडणीत फारसा बदल न करता हे टंक एकमेकांऐवजी वापरता येतात.
ह्या टंकांत शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर आवश्यक ठरणारी चिन्हे आणि देवनागरी टंकांशी जुळणारे इंग्लिश टंकही समाविष्ट आहेत.
सदर टंक मुक्त (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) परवान्यांतर्गत देण्यात आले असून त्यासोबत टंकांची सर्व तांत्रिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यशोमुद्रा आणि यशोवेणू हे दोन्ही टंक प्रयोगात्मक असून ते टंकविकसित करणाऱ्यांसाठी प्रमाण/ प्रतिमानरूप (मॉडेल) म्हणून समजण्यात येऊ नयेत. तसेच देवनागरीसाठी टंक तयार करताना त्या प्रकल्पांत हे टंक पूर्वसंदर्भ म्हणून गणण्यात येऊ नयेत.
पार्श्वभूमी

विविध भाषांच्या लिप्यांतील माहितीची संगणकावरील साठवणूक आणि देवाणघेवाण अचूक आणि सुलभरीत्या व्हावी ह्यासाठी जगभरात युनिकोड ही प्रमाणित संकेतप्रणाली वापरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनानेही मराठी भाषेचा संगणकावर वापर वाढावा ह्यासाठी युनिकोड वापरून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

युनिकोड वापरून संगणकावर काम करताना युनिकोड-आधारित टंकाची (फॉण्टची) आवश्यकता असते. महाराष्ट्रशासनाने दि. ६ नोव्हेंबर २००९ रोजी केलेल्या वर्णमाला आणि वर्णलिपीविषयक शासननिर्णयातील (https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20091106130447001.pdf) सूचनांशी जुळणारे युनिकोड-आधारित काही उत्तम टंक तयार करून ते जनतेला मुक्त (फ्री अॅण्ड ओपन सोर्स) परवान्यासह द्यावे असा विचार राज्य मराठी विकास संस्थेद्वारे करण्यात आला.

राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन हे टंक केवळ विनामूल्यच नव्हे तर मुक्त परवान्यासह (जीपीएल-३) जनतेला उपलब्ध करून देत आहे. ह्याचा अर्थ राज्य मराठी विकास संस्थेला योग्य ते श्रेय देऊन हे टंक स्वतः वापरण्यास, त्याची प्रत करून घेण्यास, त्याची सर्व (तांत्रिक आणि ज्ञानात्मक) सामग्री पाहण्यास आणि अभ्यासण्यास, ह्या सामग्रीचा वापर करून नवी सामग्री तयार करण्यास आणि ती योग्य त्या श्रेयनिर्देशासह जीपीएल-३ ह्याच परवान्या-अंतर्गत वितरित करण्यास स्वामित्वहक्कधारक म्हणून राज्य मराठी विकास संस्था मान्यता देत आहे.

ह्यामुळे जनतेला केवळ टंक उपलब्ध होत नसून त्यांना आवश्यक वाटणारे बदल शक्य असल्यास स्वतः करण्याचा वा करवून घेण्याचा पर्याय उपलब्ध होतो. जाणकारांना ही सामग्री वापरून अधिक चांगल्या टंकांची निर्मिती करून ती ह्याच परवान्यासह लोकांना उपलब्ध करून देता येईल.

 

टंकविकासक-

सीडॅक, जिस्ट, पुणे

तज्ज्ञसमिती-

टंकतज्ज्ञ : प्रा. मुकुंद गोखले, प्रा. संतोष क्षीरसागर, डॉ. गिरीश दळवी

इतर तज्ज्ञ : डॉ. रमेश धोंगडे, श्री. प्रकाश विश्वासराव, श्री. मकरंद गद्रे, डॉ. अभिजात विचारे

अभिप्राय द्यायला विसरू नका!