सूचना
पुस्तकांचं गाव भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील प्रकल्पातील साहित्य खरेदीसाठी दरपत्रक सादर करणेबाबत अल्पमुदतीची सूचना
पुस्तकांचे गाव भिलार येथील विविध दालनातील साहित्य खरेदी सोबत दिलेल्या अटी-शर्ती व तक्त्यात नमूद केलेल्या विधीनिर्देशाप्रमाणे व त्या साहित्यासमोर नमूद केलेल्या संख्येनुसार करावयाची आहे. त्यासाठी नामांकित पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
कामाची व्याप्ती (SCOPE OF WORK) खालीलप्रमाणे –
खरेदी करावयाचे साहित्य-
| अ.क्र | वस्तू | एकूण मागणी |
| १ | खुर्ची | २५० |
| २ | टेबल | ४५ |
| ३ | टिपॉय | ४५ |
| ४ | डस्टबीन | ४५ |
अटी, शर्ती व दरपत्रकांचा नमुना सोबत जोडला आहे. त्याच नमुन्यात दरपत्रक सादर करावे. दरपत्रके दिनांक ०२.१२.२०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या कार्यालयास प्राप्त होतील अशा प्रकारे पाठवावी. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दरपत्रके उघडण्यात येतील. दरपत्रके उघडण्याचा वेळ आणि दिनांक बदल करण्याचे अधिकार संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांना राहतील. त्याबाबतची पूर्वसूचना संबंधितांना मोबाईलद्वारे कळविण्यात येईल.
नोटीस/नमूना/अटी व शर्ती (पुगाभि)