केंद्र शासनाच्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम – २०१३” मधील तरतुदीनुसार, महिला व बालविकास विभाग, शासननिर्णय दि.१९.६.२०१४ ला अनुसरुन, राज्य मराठी विकास संस्थेमध्ये दि. १६.६.२०२३ अन्वये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यात दि. ०८.०७.२०२५ च्या कार्यालयीन आदेशान्वये “अंतर्गत तक्रार समितीमध्ये” खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

अ.क्र. अधिकारी/कर्मचारी यांचे नाव पदनाम पद
१. श्रीमती नेहा शिरीष मोहोड लघुलेखक अध्यक्ष
२. श्री. सुरेंद्र सदाशिव वेंगुर्लेकर रोखपाल सदस्य
३. श्रीमती मधुरा महेश गणपुले लिपिक-टंकलेखक सदस्य
४. श्रीमती दक्षता आनंद गायकवाड लिपिक-टंकलेखक सदस्य
५. श्रीमती नमिता कीर अशासकीय सदस्य, नियामक मंडळ, रा.म.वि.संस्था अशासकीय सदस्य
श्री.गिरीश पतके प्रशासकीय अधिकारी सदस्य-सचिव

याबाबतचा कार्यालयीन आदेश अंतर्गत तक्रार समिती येथे देण्यात येत आहे.

तसेच, भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे कामाच्या ठिकाणी महिलाच्या लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम-२०१३ अंतर्गत Sexual Harassment Electronic Box (She-Box) या ऑनलाईन तक्रारीची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी पुढील दुव्यावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. Sexual Harassment Electronic Box (She-Box)