अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ अशा पाच जिल्ह्यांमध्ये बोलली जाणारी वऱ्हाडी बोली ही मराठीतील एक महत्त्वाची बोली. ह्या बोलीतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी इ. घटकांचे दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने, वऱ्हाडी बोलींच्या अभ्यासप्रकल्पांतर्गत, वऱ्हा़डी बोलीच्या शब्दकोशाचे दोन खंड आणि वऱ्हाडी बोलींतील वाक्प्रचार आणि म्हणी ह्यांचे प्रत्येकी एक खंड असे एकूण चार खंड राज्य मराठी विकास संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येत आहेत.
वऱ्हा़डी बोलीत लेखन करून तिला ख्याती मिळवून देणारे डॉ. विठ्ठल वाघ हे ह्या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तर डॉ. रावसाहेब काळे हे साहाय्यक संशोधक आहेत. या शब्दकोशाची संकल्पना साहित्य संस्कृती मंडळ यांचे तर नियोजन श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांचे आहे. या प्रकल्पाचे प्रकल्प संयोजक म्हणून डॉ. मनोज तायडे (मराठी भाषा विभाग प्रमुख, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) प्रकाशन संस्था म्हणून म.रा.मराठी भाषा विकास समिती यांनी काम केले आहे. प्रमाण भाषेसोबतच मराठीच्या बोलींच्या अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. हे चारही खंड सर्वांना महाजालावरून पाहण्यासाठी तसेच विनामूल्य उतरवून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेने केवढी मोठी कामे केली आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी, मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी मोठा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. हे काम असेच निरंतर चालावे, हीच सदिच्छा.
राज्य मराठी विकास संस्थेने केवढी मोठी कामे केली आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी, मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी मोठा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. हे काम असेच निरंतर चालावे, हीच सदिच्छा.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्था कृतिशील उपक्रम राबवत आहे.याबद्दल संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन ⚘