राज्य मराठी विकास संस्थेने आपले मध्यवर्ती संदर्भ-ग्रंथालय उभारण्यासाठी श्री. श्याम जोशी यांच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाद्वारे संकलित केलेला ग्रंथसंचय ऑगस्ट, २०१९ मध्ये आपल्या ताब्यात घेतला आहे. या संदर्भ ग्रंथालयात पुस्तके आणि नियतकालिके मिळून एकूण ७६ हजार एवढी ग्रंथसंपदा आहे.
या संदर्भ-ग्रंथालयात कोश वाङ्मय, ख्रिस्ती वाङ्मय, बौद्ध वाङ्मय, सूचि वाङ्मय, लोकसाहित्य, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक साहित्य, वैचारिक साहित्य, अनुवादित साहित्य, धार्मिक साहित्य, समीक्षात्मक साहित्य, दलित-साहित्य, कविता, नाटक, चरित्र/आत्मचरित्र अशा अनेक प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह असून त्यात दोलामुद्रिते, दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते ह्यांचा समावेश आहे. नियतकालिकांचे वाङ्मयीन नियतकालिके आणि दिवाळी अंक असे विभाग आहेत. काही ख्यातनाम वाङ्मयीन नियतकालिकांचे संपूर्ण संच या संदर्भ-ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. तसेच या संदर्भ-ग्रंथालयात नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यांच्या पहिल्या आवृत्यांचा स्वतंत्र संग्रह करण्यात आलेला आहे.
मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधक यांना या संदर्भग्रंथालयातील संदर्भसेवा सशुल्क उपलब्ध करून देण्यात येत असते.
संदर्भग्रंथालयाचा पत्ता :
तळघर, तेलवणे टॉवर,
पाटीलपाडा, बदलापूर रेल्वे स्थानकासमोर,
बदलापूर (पूर्व), जि. ठाणे – ४२१ ५०३
संपर्क क्रमांक :
ग्रंथपाल – ९८९२०७२५७२
दिशानिर्देश – संदर्भग्रंथालय