ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे यानिमित्ताने दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात येतात.

मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना  हे पुरस्कार देण्यात येतात. सुरुवातीला या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रु.१ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे होते.  तर सन २०१७-१८ पासून पुरस्काराच्या रकमेत वाढ करून ती प्रत्येकी रु. २ लाख इतकी करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उपस्थितांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री, सांस्कृतिक मंत्री, महापौर, खासदार, आमदार व इतरही नेतेमंडळी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पाडला जातो.

डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

——–♦ पुरस्कारांचे मानकरी ♦——–

वर्ष २०१५ – डॉ. मॅक्सीन बर्नसन, फलटण

वर्ष २०१६ – श्रीमती यास्मिन शेख, पुणे.

वर्ष २०१७ – अविनाश बिनीवाले, पुणे.

वर्ष २०१८ – कल्याण काळे, पुणे.

वर्ष २०१९ – प्रा. डॉ. आर. विवेकानंद गोपाळ, तंजावर

कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार

——–♦ पुरस्कारांचे मानकरी ♦——–

वर्ष २०१५ – श्रीमती बेबीताई गायकवाड, अहमदनगर.

वर्ष २०१६ – श्री. श्याम जोशी, बदलापूर.

वर्ष २०१७ – मराठी विज्ञान परिषद, मुंबई.

वर्ष २०१८ – श्री. हरिश्चंद्र बोरकर, भंडारा.

वर्ष २०१९ – श्री. अनिल गोरे (मराठी काका), पुणे.

 

 

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!