खेळाच्या माध्यमातून विषय सोपा करून शिकवला की तो विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो, आकलनास सोपा होतो. त्याप्रमाणे काही भाषिक खेळ तयार केले जातात किंवा संकल्पना विकसित करण्यासाठी खरेदी केले जातात.
‘शब्दहौशी’ आणि ‘नाव गाव फळ फूल’ या खेळांची छपाई राज्य मराठी संस्थेकडून करण्यात आली आहे. शब्दहौशी या खेळाची संकल्पना श्री. विजय देशपांडे यांची असून तिचे विकसन त्यांच्या कन्या प्रा. सोनाली गुजर यांनी केले. इंग्रजी हाउजी या खेळाच्या धर्तीवर हा खेळ मराठी भाषेसाठी विकसित केला आहे. नाव-गाव-फळ-फुल हा सुद्धा असाच एक नाविन्यपूर्ण खेळ आहे.