

भाषाविषयक विविध प्रश्नांच्या संदर्भात जिज्ञासू वाचकांची जाण अनेक अंगांनी वाढविणे हे राज्य मराठी विकास संस्थेला आपले एक महत्त्वाचे कार्य वाटते. ते उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून राज्य मराठी विकास संस्थेने सदर पुस्तक दिनांक २७ फेब्रुवारी, २००० रोजी कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक हे श्री. अविनाश बिनीवाले यांचे. यांनी ‘लोकसत्ता’ या मान्यवर दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीत १९९४ ते १९९९ या काळात जी भाषाविषयक सदरे लिहिली त्यांचे हे संकलन आहे. हे पुस्तक भाषाविषयक विचारक्षेत्रांचा विनोदात्म शैलीत परामर्श घेतात. अविनाश बिनीवाले यांनी मराठी भाषिकाला वर्णमाला, लिपी, उच्चार, इत्यादींच्या संदर्भात जगातल्या विविध भाषांच्या व्यापक विश्वातून गंमतीजमती सांगत फिरवून आणले आहे. या पुस्तकाचे अभिवाचन व त्याचे ध्वनिमुद्रण हे श्री. प्रसाद घाणेकर यांनी केले आहे.
हे पुस्तक श्राव्य पुस्तकात म्हणून रूपांतरित करण्यासाठी श्री. अविनाश बिनीवाले यांनी संस्थेला अनुमती दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या श्राव्य पुस्तकाचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून हे पुस्तक जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. नक्कल करून त्यांची विक्री करणे, ती आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
भाषा आपली सर्वांचीच येथून पुस्तकाची PDF उतरवून घेऊ शकता.
