मराठी विकिपीडिया : परिचयात्मक कार्यशाळा
दि. ०१ जानेवारी २०२१ | वेळ – दुपारी ४ ते ५.३० वाजता
राज्य मराठी विकास संस्थेद्वारे २०२०-२१ ह्या वर्षांत मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार ह्या शीर्षकांतर्गत विविध उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार असून ह्या उपक्रमांतर्गत जानेवारी महिन्यात मराठी विकिपीडियाविषयी परिचयात्मक सत्र घेण्यात येत आहे. सदर सत्रात मराठी विकिपीडिया ह्या महाजालावरील मुक्त ज्ञानकोशाविषयी अगदी प्राथमिक माहिती पुरवण्यात येईल. त्यात मुक्त ज्ञानकोशाची संकल्पना स्पष्ट करण्यात येईल. ज्ञानकोशाचे स्वरूप आणि त्यात संपादन (आधीच्या नोंदीत बदल तसेच नवीन नोंद तयार करणे) कसे करायचे ह्याची तंत्रज्ञानात्मक माहिती पुरवण्यात येईल. मुक्त ज्ञानकोशांत नोंदी करताना अथवा छायाचित्रे, चलच्चित्रे इ. सामग्री समाविष्ट करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ह्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
मराठी विकिपीडिया : परिचयात्मक सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.
https://forms.gle/f89C95ZPeVA8or6H8