कवितांचे गाव या उपक्रमांतर्गत उभादांडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे १४ दालनांसाठी विविध फलक तयार करणे व उभारणे यासाठीची अल्पमुदतीची नोटीस.
कवितांचे गाव या उपक्रमांतर्गत उभादांडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे १४ ग्रामस्थांनी स्वेच्छेने दिलेल्या त्यांच्या घरातील खोलीत कवितासंग्रह/पुस्तकसाहित्य दालने उभारण्याची कार्यवाही तातडीने करावयाची आहे. त्यासाठीच्या सोबत जोडलेल्या अटी व शर्तीनुसार खालील कामांचे एकत्रित दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
कामाची व्याप्ती (SCOPE OF WORK) खालीलप्रमाणे
१) फलक –
अ.क्र. | कामाचे स्वरूप | कामाचा तपशील |
१) | उभादांडा गावातील एकत्रित सर्व दालनांचा नकाशा दाखविणारे फलक
(एकूण फलक ४) |
१)वेंगुर्ला बस स्थानकाजवळ १ फलक उभारणे
२)कुडाळ, सावंतवाडी मधून उभादांडा गावात येणारा रस्त्यावर १ फलक उभारणे. ३)रेडी-रेवस रस्त्यावरून उभादांडा गावात प्रवेश करणारा रस्त्यावर १ फलक उभारणे. ४)सागरेशवर रस्त्याच्या कमानीजवळ १ फलक उभारणे. असे प्रत्येकी एक म्हणजे एकूण ०४ फलक उभारणे. फलकाचे आकारमान साधारणत: ६फूट रूंद x ४फूट उंच वरील चारही फलकांसाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे व योग्य ते खांब उभारणी करून त्यावर फलक लावणे. |
२) | दालनांचे फलक
(एकूण फलक १४) |
१) या फलकावर दालननिहाय नावे आणि दालनचालकाचे नाव लिहिण्यात येईल.
एकूण १४ फलक तयार करणे फलकाचे क्षेत्रफळ साधारणत: ३ फूट रूंद x २ फूट उंच दालनचालकाच्या संमतीने दर्शनी भागास फलक लावणे. |
३) | दिशादर्शक फलक
(एकूण फलक २८) |
१) या फलकावर दालनांची दिशा दर्शविण्याबाबतची माहिती दर्शविली जाईल. (जसे की, दालन क्र. व दालनाचे अंतर व दिशादर्शक)
२) फलकाचे क्षेत्रफळ साधारणतः १८ इंच रुंदी X १२ इंच उंची असावे. |
(टीप – फलकांवर लिहावयाचा आशय स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
उपरोक्त तक्त्यातील कामाचे एकत्रितपणे एक दरपत्रक पाठविण्यात यावे.
अटी, शर्ती व दरपत्रकांचा नमुना सोबत जोडला आहे. त्याच नमुन्यात दरपत्रक सादर करावे. दरपत्रके दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत या कार्यालयास प्राप्त होतील अशा प्रकारे पाठवावी. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दरपत्रके उघडण्यात येतील. दरपत्रके उघडण्याचा वेळ आणि दिनांक बदल करण्याचे अधिकार संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांना राहतील. त्याबाबतची पूर्वसूचना संबंधितांना मोबाईलद्वारे कळविण्यात येईल.
सदरची दरपत्रके मा. संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांच्या नावे वरील पत्त्यावर हस्तपोच / डाक / कुरीअर द्वारे पाठविण्यात यावीत.
नोटीस/नमूना/अटी व शर्ती (कगायो-फलक)