विषय – “कवितांचे गाव” या उपक्रमांतर्गत उभादांडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे १४ दालनांच्या उभारणीसाठी खालील कामांचे एकत्रित दरपत्रक सादर करण्याबाबत.
कवितांचे गाव या उपक्रमांतर्गत उभादांडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे १४ ग्रामस्थांनी स्वेच्छेने दिलेल्या त्यांच्या घरातील खोलीत कवितासंग्रह/पुस्तकसाहित्य दालने उभारण्याची कार्यवाही तातडीने करावयाची आहे. त्यासाठीच्या सोबत जोडलेल्या अटी व शर्तीनुसार खालील कामांचे एकत्रित दरपत्रक मागविण्यात येत आहेत.
कामाची व्याप्ती (SCOPE OF WORK) खालीलप्रमाणे
१) दालनांत करावयाची कामे –
अ.क्र. | कामाचे स्वरूप | कामाचा तपशील |
१ | डागडुजी | १) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये आवश्यकतेनुसार प्रती चौ. फुट या दराने भिंतींची (निखळलेले प्लास्टर, निकृष्ठ दर्जाचे प्लास्टर असल्यास) दुरूस्ती करणे.
२) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये तळभागावरील(फ्लोअरींग) सपाटीकरण करणे. (गरजेनुसार) |
२ | रंगकाम | १) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये प्रती चौ. फुट दराने आजूबाजूच्या खोलींच्या रंगसंगतीनुसार मिळतेजुळते रंगकाम करणे.
२) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये ज्येष्ठ, प्रसिद्ध तसेच पुरस्कार प्राप्त कवींचे चित्र रेखाटणे. (आकारमान ४X४ चौ. फूट) (कोणत्या दालनात कोणत्या कवींची चित्रे रेखाटवयाची आहेत याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.) ३) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार दालनांमधील भिंतींवर मराठी भाषेतील विविध कविता लिहिणे. ४) रंगकाम हे प्राईमरने व रॉयल एक्रेलिक रंगाने रंगविणे. |
३ | वीजकाम | १) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमधील छतावर (सिलिंग) नियमित स्वरूपातील आकाराचा पंखा (छतावरील किंवा भिंतीवरील) बसविणे.
२) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये उत्तम प्रकाश देणारी ट्युबलाईट/एलईडी दिवा तसेच यासाठी लागणारे पॉइंट्स तयार करून देणे. ३) १४ प्रस्तावित दालनांच्या खोलीमध्ये एक मोबाईल चार्जिंगकरीता पॉइंट तयार करून देणे. ४) वरील ३ कामे लक्षात घेता त्यानुसार दालनांत वायरींग करणे. |
उपरोक्त तक्त्यातील कामाचे स्वरूप पाहता तक्त्यामधील अ.क्र.१, २ आणि ३ याचे एकत्रितपणे एक दरपत्रक पाठविण्यात यावे.
अटी, शर्ती व दरपत्रकांचा नमुना सोबत जोडला आहे. त्याच नमुन्यात दरपत्रक सादर करावे. दरपत्रके दिनांक ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत या कार्यालयास प्राप्त होतील अशा प्रकारे पाठवावी. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दरपत्रके उघडण्यात येतील. दरपत्रके उघडण्याचा वेळ आणि दिनांक बदल करण्याचे अधिकार संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांना राहतील. त्याबाबतची पूर्वसूचना संबंधितांना मोबाईलद्वारे कळविण्यात येईल.
सदरची दरपत्रके मा. संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांच्या नावे वरील पत्त्यावर हस्तपोच / डाक / कुरीअर द्वारे पाठविण्यात यावीत.
नोटीस/नमूना/अटी व शर्ती (कगायो)