राज्य मराठी विकास संस्थेद्वारे ‘तमिळ विद्यापीठ, तंजावर’ येथे असलेल्या मोडी हस्तलिखितांचे जतन, संवर्धन व संगणकीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत संगणकीकृत केलेल्या मोडी हस्तलिखितांच्या प्रतिमा या हार्डडिस्कमध्ये साठविण्यात आल्या आहेत.

          या हार्डडिस्कमधील संपूर्ण डाटा व हार्डडिस्क तपासणे, नवीन हार्डडिस्कची खरेदी करणे व जुन्या हार्डडिस्कमधील डाटा नवीन हार्डडिस्कमध्ये स्थानांतरित (Transfer) करणे (ease of access सह) इत्यादी कामे करण्यासाठी सदर सूचनेद्वारे इच्छुक संस्थांकडून खाली नमूद केलेल्या कामाच्या स्वरूपानुसार व सोबत जोडलेल्या नमुन्यानुसार दरपत्रके सादर करण्यात यावीत.

अ.क्र. कामाचे स्वरूप
संस्थेकडील हार्डडिस्कची तपासणी करणे.
नवीन हार्डडिस्कची खरेदी करणे. (एकूण २०) (१ टीबी इतक्या क्षमतेची SSD ड्राईव्ह.)
जुन्या हार्डडिस्कमधील डाटा नवीन हार्डडिस्कमध्ये स्थानांतरित करणे

          सदर दरपत्रके संस्थेच्या कार्यालयात दि. ०८.०५.२०२४ रोजी सायं. ०५.०० वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करावीत. सदर दरपत्रके कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी उघडण्यात येतील.

 

नोटीस/नमूना/अटी व शर्ती (मोडी)

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!