• महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत मराठी भाषेतील प्रतिमुद्राधिकाराची (कॉपीराइटची) मुदत संपलेले दुर्मिळ ग्रंथ महाजालावर उपलब्ध करून द्यावे असे म्हटले आहे. त्यानुसार मराठी भाषा विभागाच्या आदेशाप्रमाणे (शासननिर्णय क्र. रासांधो १०१२/ प्र. क./२०१२/भाषा-३ दि. २८ मार्च २०१३) राज्य मराठी विकास संस्थेद्वारे असे ग्रंथ आणि नियतकालिके महाजालावर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रतिमुद्राधिकाराच्या कक्षेत येणारे काही ग्रंथही प्रतिमुद्राधिकारधारकांची उचित अनुमती प्राप्त झाल्यास संस्थेद्वारे संगणकीकृत करून अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असतात.
  • त्यानुसार ख्यातकीर्त लेखक श्री. जया दडकर ह्यांचे काही ग्रंथ त्यांच्या अनुमतीने अभ्यासकांसाठी संगणकीय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
  • सदर ग्रंथाचे प्रतिमुद्राधिकार श्री. जया दडकर ह्यांच्याकडे असून केवळ अभ्यासकांच्या सोयीसाठी ही सामग्री त्यांच्या अनुमतीने आणि सहकार्याने महाजालावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

डाऊनलोड करा

अभिप्राय द्यायला विसरू नका!