मराठी भाषा युवक मंडळे – २०२४
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर परंतु देशातंर्गत मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे व या उपक्रमांतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून मान्यताप्राप्त मराठी भाषा युवक मंडळांतून निवड झालेल्या प्रत्येक पात्र मंडळाला वार्षिक रु. १०,०००/- इतके अनुदान सहाय्य करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील तथा महाराष्ट्राबाहेरील परंतु देशांतर्गत मराठी भाषा युवक मंडळे नोंदणीकृत असावीत.
या उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिनांक ०१/०३/२०२४ ते १५/०३/२०२४ या कालावधीत, खालील विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत
मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे याबाबतचा मराठी भाषा विभागामार्फंत दि. १३ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासननिर्णय https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202307131254482233.pdf या दुव्यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या शासननिर्णयात नमूद केलेली व्याप्ती, अपेक्षित उपक्रम, अटी व शर्ती, अंमलबजावणीचे टप्पे व सर्वसाधारण नियमावली यांचे वाचन करून खालील गुगल अर्ज (Google) भरण्यात यावा.
सदर अर्ज मराठीत (देवनागरीत) भरणे बंधनकारक आहे.
खालील बटणांवर क्लिक करून धारिका (Files) डाऊनलोड (Download) कराव्यात.
जाहिरात | शासननिर्णय | गुगल अर्ज |