मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२३
कार्यक्रमांविषयी माहिती
मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालयांबरोबर शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढावा म्हणून  सन २०१३ पासून  शासन निर्णयान्वये दरवर्षी  “मराठी  भाषा  संवर्धन  पंधरवडा” साजरा  करण्याचा  निर्णय  घेण्यात  आला  आहे.  सन २०२१ पासून राज्यातील  सर्व  शासकीय/निमशासकीय  कार्यालये/महामंडळे, केंद्र  शासनाच्या  अखत्यारीतील  सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक  उपक्रम, सर्व  खाजगी  व  व्यापारी  बँका, सर्व  शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा केला जातो.

कार्यक्रम

(२४ ते २७ जानेवारी २०२३, महाजालावरून )

कार्यक्रमांचे दुवे
दिनांक विषय दुवे
२४ जानेवारी साहित्य कट्टा मराठी साहित्यातील दिग्गज लेखक आणि कवींशी मनमोकळ्या गप्पा. सहभागी लेखक : श्रीकांत बोजेवार

सहभागी कवियित्री : सिसिलिया कार्व्हालो

सूत्रसंचालन : अर्पिता विद्वांस

२५ जानेवारी साहित्य कट्टा मराठी साहित्यातील दिग्गज लेखक आणि कवींशी मनमोकळ्या गप्पा. सहभागी लेखिका : शिल्पा कांबळे

सहभागी कवी : प्रसाद कुलकर्णी

सूत्रसंचालन : शिल्पा साने.

२६ जानेवारी साहित्य कट्टा मराठी साहित्यातील दिग्गज लेखक आणि कवींशी मनमोकळ्या गप्पा. सहभागी लेखक, व्याख्याते : डॉ. सच्चिदानंद शेवडे.

सहभागी कवयित्री : स्पृहा जोशी

सूत्रसंचालन : प्रियंवदा सावंत.

२७ जानेवारी साहित्य कट्टा मराठी साहित्यातील दिग्गज लेखक आणि कवींशी मनमोकळ्या गप्पा. सहभागी लेखक : प्राजक्त देशमुख

सहभागी कवी: ऐश्वर्य पाटेकर

सूत्रसंचालन : शिल्पा साने.

अभिप्राय द्यायला विसरू नका!