कार्यक्रम
राज्य मराठी विकास संस्था आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम
“मराठी भाषा : वासंतिक उत्सव”
भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी
दि. २० मे ते ३ जून २०२२
स्थान – कलांगण, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
थेट प्रक्षेपण – संस्थेच्या युट्युब चॅनलवरून (YouTube)
दिनांक वेळ कार्यक्रम
२० मे २०२२ सायं. ६.३० वाजता कवितेचं बेट (विविध विषयांवरील स्वलिखित कवितांचा बहारदार कार्यक्रम)
रात्रौ ८ वाजता मराठी वाङमयाचा  घोळीव इतिहास (मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास या पु. ल. देशपांडे यांच्या दीर्घ लेखावर आधारित नाट्य सादरीकरण)
२१ मे २०२२ सायं. ६.३० वाजता अनवट शांताबाई  (शांताबाई शेळके यांच्या भावस्पर्शी कविता, गीते व ललितपर लेखन यांचे सादरीकरण)
२२ मे २०२२ सायं. ६.३० वाजता इये मराठीचिये संगमावरी (मराठी भाषेतील कवितांवर आधारित कार्यक्रम)
रात्रौ ८ वाजता नली – निरपेक्ष प्रेमाची गोष्ट (मराठी सोबतच अहिराणी आणि तावडी या खानदेशी  बोलीभाषांतील एकल नाट्यप्रयोग)
२३ मे २०२२ सायं. ६.३० वाजता स्टार (अवयवदानाबाबत जनजागृती करणारी मराठीच्या कुपारी बोली भाषेतील –  बोलीभाषा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरलेली एकांकिका)
रात्रौ ८ वाजता एच. एम. व्हि. – हिज मास्टरस् व्हाईस (विज्ञान-साहित्यावर आधारित किर्तनातून विज्ञानाचा प्रसार करणारा कार्यक्रम)
२४ मे २०२२ सायं. ६.३० वाजता बाई समजून घेताना (कवी किरण येले यांच्या बाईच्या कविता या काव्यसंग्रहावर आधारित दीर्घांक)
रात्रौ ८ वाजता अक्षरनामा (मराठी भाषेतील महान साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम)
१० २५ मे २०२२ सायं. ६.३० वाजता टपाल (भारतातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या व नेत्यांच्या पत्रांचे अभिवाचन)
११ रात्रौ ८ वाजता समाजप्रबोधनपर सोंगी भारुड
१२ २६ मे २०२२ सायं. ६.३० वाजता लिहिणारे कलाकार
१३ २७ मे २०२२ सायं. ६.३० वाजता लाली (नगरी भाषेतील पारितोषिक विजेती एकांकिका)
१४ रात्रौ ८ वाजता सवारी भवानी चौकामधी (घाटी सातारी बोलीभाषेतील – बोलीभाषा स्पर्धेतील पारितोषिक विजेती एकांकिका)
१५ २८ मे २०२२ सायं. ६.३० वाजता मी मुक्त मुक्त मुक्ताई (ज्ञानेश्वर माऊलींची लहान बहीण मुक्ताबाई ह्यांचा जीवनपट उलगडून त्यांची आध्यात्मिक ताकद आणि त्यांच्या हरिपाठापासून त्यांच्या साहित्याचा धांडोळा..)
१६ रात्रौ ८ वाजता काव्य मराठी – कविता महाराष्ट्राची (मराठी कवितेचा तिच्या बोलीभाषेतील अलंकाराने नटलेला कार्यक्रम)
१७ २९ मे २०२२ सायं. ६.३० वाजता दास्तान-ए-बडी-बांका (मूळचा उर्दू असलेला ‘दास्तानगोई’ या कलाप्रकाराचा मराठी कार्यक्रम)
१८ ३० मे २०२२ सायं. ६.३० वाजता मराठी माझी देवालाही आवडे (संत साहित्यावर आधारित कार्यक्रम)
१९ ३१ मे २०२२ सायं. ६.३० वाजता खडीगंमत (वैदर्भी भाषेतील पारंपारिक कार्यक्रम)
२० ०१ जून २०२२ सायं. ६.३० वाजता नादप्रहर
२१ ०२ जून २०२२ सायं. ६.३० वाजता जीर्णोद्धार (माणसांमधला देव शोधू सांगणारी पारितोषिक विजेती सातारी बोलीभाषेतील एकांकिका)
२२ रात्रौ ८ वाजता स्त्री, जातं, ओवी आणि कविता (कवी किरण येले यांच्या स्त्री विषयक कवितांवर आधारित कार्यक्रम)
२३ ०३ जून २०२२ सायं. ६.३० वाजता रंग नवा (विविध कवींच्या कवितांवर आधारित काव्यवाचन आणि गायनाचा मनोरंजक कार्यक्रम)

अभिप्राय द्यायला विसरू नका!