दि. ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागामार्फत अभिजात मराठी भाषेचे दालन तसेच “शांतता….. मराठीचा कोर्ट चालू आहे” या एका लघुपटाची निर्मिती करून त्याचे खेळ सादर करण्यात आले होते.
अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या प्राचीनत्वाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा, मराठीतील उपलब्ध आणि अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहमनीकाल ते शिवकालीन आणि पेशवेकालीन मराठी, एकोणिसाव्या शतकातील मराठी, आधुनिकता आणि मराठी, मराठी साहित्यपरंपरेचे दालन अशा दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासासंबंधी माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे आणि त्याच्याशी संबंधीत शिलालेखांच्या प्रतिकृती, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, विविध वाङमय प्रकार, काही निवडक गाथा, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, साहित्य यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन १६ विविध दालने उभारण्यात आली होती.
“शांतता… मराठीचा कोर्ट चालू आहे” या लघुपटाच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी न्यायालयीन प्रसंगाची योजना करून वाद-विवाद आणि संवाद यांच्या माध्यमांतून सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभ सोप्या पद्धतीने मराठी भाषा विभागाचे म्हणणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
मरठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी विनंती करणारे दहा हजार पेक्षा जास्त पत्रे संमेलनास भेट देणाऱ्या नागरिकांच्या सहीने राष्ट्रपती महोदयांना पाठवण्यात आली आहेत.
लघुपटाचा दुवा – https://youtu.be/-k2F2tC1Tlo