ऑनलाइन पुस्तकविक्री - ०३ सप्टेंबर २०२१

ऑनलाइन पुस्तकविक्री विषयक मार्गदर्शन-सत्र

शुक्रवार, दि. ०३ सप्टेंबर २०२१ | वेळ – दुपारी ३ ते ४.३० वाजता

मराठी भाषा प्रचार-प्रसार ह्या उपक्रमांतर्गत राज्य मराठी विकास संंस्थाद्वारे ऑनलाइन पुस्तकविक्री ह्या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दि. ०३ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. सदर सत्रात ऑनलाइन पुस्तकविक्री करण्यासाठीची प्रक्रिया कशी आहे ह्या विषयावर मॅजेस्टिक प्रकाशन चे प्रकाशक, श्री. अशोक कोठावळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

सदर सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशनप्रक्रिया - ०६ ऑगस्ट २०२१

पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशनप्रक्रिया विषयक मार्गदर्शन-सत्र

शुक्रवार, दि. ०६ ऑगस्ट २०२१ | वेळ – दुपारी ३ ते ४.३० वाजता

मराठी भाषा प्रचार-प्रसार ह्या उपक्रमांतर्गत राज्य मराठी विकास संंस्थाद्वारे पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशनप्रक्रिया ह्या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दि. ०६ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले आहे. सदर सत्रात पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशनप्रक्रिया ह्या विषयावर शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर येथील श्रीमती. सुमती लांडे ह्या मार्गदर्शन करणार आहेत.

सदर मार्गदर्शन-सत्र हे निःशुल्क आहे. तसेच सहभागासाठी नोंदणी केलेल्या सदस्यांनाच इ-टपालाने सत्राचा दुवा पाठवण्यात येईल.

सदर सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

https://forms.gle/ZRkyMtsrQmYNnZNy5

मराठी पटकथा-लेखन - ०७ मे २०२१

मराठी पटकथा-लेखन मार्गदर्शन-सत्र

दि. ०७ मे २०२१ | वेळ – दुपारी ३ ते ४.३० वाजता

मराठी भाषा प्रचार-प्रसार ह्या उपक्रमांतर्गत राज्य मराठी विकास संंस्थाद्वारे मराठी पटकथा-लेखन ह्या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दि. ७ मे २०२१ रोजी करण्यात आले आहे. सदर सत्रात मराठी पटकथा-लेखन कसे करावे ह्याविषयी राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट-समीक्षक आणि भारतीय चित्रपट अकादमीचे दिग्दर्शक श्री. अशोक राणे हे मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी  पटकथा-लेखनाविषयीच्या ह्या मार्गदर्शनपर सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

https://forms.gle/BdNM9esQmYtvmshn7

मराठी संहिता-लेखन - ०९ एप्रिल २०२१

मराठी संहिता-लेखन मार्गदर्शन-सत्र

दि. ०९ एप्रिल २०२१ | वेळ – दुपारी ४ ते ५.३० वाजता

मराठी भाषा प्रचार-प्रसार ह्या उपक्रमा अंतर्गत राज्य मराठी विकास संंस्थाद्वारे मराठी संहिता-लेखन ह्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दि. ९ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले आहे. सदर सत्रात मराठी संहिता-लेखन कसे करावे ह्याबाबत मराठी-हिंदी नाटककार, पटकथा लेखक, चित्र-नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अभिराम भडकमकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी  संहिता-लेखनाविषयीच्या ह्या मार्गदर्शनपर सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

https://forms.gle/gUnR9dpGufGq5Zjg9

मराठी व्यावसायिक-लेखन कार्यशाळा - ०५ मार्च २०२१

मराठी व्यावसायिकलेखन मार्गदर्शन-सत्र

दि. ०५ मार्च २०२१ | वेळ – दुपारी ४ ते ५.३० वाजता

मराठी भाषा प्रचार-प्रसार ह्या उपक्रमा अंतर्गत राज्य मराठी विकास संंस्थाद्वारे मराठी व्यावसायिकलेखन ह्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दि. ५ मार्च २०२१ रोजी करण्यात आले आहे. सदर सत्रात मराठी  व्यावसायिकलेखन कसे करावे ह्याबाबत ज्येष्ठ चित्रपट निर्माते, तज्ज्ञ श्री. श्रीरंग गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी  व्यावसायिकलेखनाविषयीच्या ह्या मार्गदर्शनपर सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

https://forms.gle/MaM6rwRPeAqkft4P7

मराठी अनुवाद लेखन कार्यशाळा - ०५ फेब्रुवारी २०२१

मराठी अनुवाद लेखन मार्गदर्शन सत्र

दि. ०५ फेब्रुवारी २०२१ | वेळ – दुपारी ४ ते ५.३० वाजता

मराठी भाषा प्रचार-प्रसार अंतर्गत राज्य मराठी विकास संंस्थाद्वारे मराठी अनुवाद लेखन ह्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले आहे. सदर सत्रात मराठी अनुवाद लेखन कसे करावे ह्याबाबत ज्येष्ठ अनुवादक तज्ञ श्रीमती उमा कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी अनुवाद लेखन मार्गदर्शनपर सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

https://forms.gle/CY3woCtHvZKZZ5Uu8

मराठी विकिपीडिया : परिचयात्मक कार्यशाळा - ०१ जानेवारी २०२१

मराठी विकिपीडिया : परिचयात्मक कार्यशाळा

दि. ०१ जानेवारी २०२१ | वेळ – दुपारी ४ ते ५.३० वाजता

राज्य मराठी विकास संस्थेद्वारे २०२०-२१ ह्या वर्षांत मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार ह्या शीर्षकांतर्गत विविध उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार असून ह्या उपक्रमांतर्गत जानेवारी महिन्यात मराठी विकिपीडियाविषयी परिचयात्मक सत्र घेण्यात येत आहे. सदर सत्रात मराठी विकिपीडिया ह्या महाजालावरील मुक्त ज्ञानकोशाविषयी अगदी प्राथमिक माहिती पुरवण्यात येईल. त्यात मुक्त ज्ञानकोशाची संकल्पना स्पष्ट करण्यात येईल. ज्ञानकोशाचे स्वरूप आणि त्यात संपादन (आधीच्या नोंदीत बदल तसेच नवीन नोंद तयार करणे) कसे करायचे ह्याची तंत्रज्ञानात्मक माहिती पुरवण्यात येईल. मुक्त ज्ञानकोशांत नोंदी करताना अथवा छायाचित्रे, चलच्चित्रे इ. सामग्री समाविष्ट करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ह्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

मराठी विकिपीडिया : परिचयात्मक सत्रात सहभागी होण्यासाठी खालील दुव्यावर जोडलेला गूगल-अर्ज भरावा.

https://forms.gle/f89C95ZPeVA8or6H8

अभिप्राय द्यायला विसरू नका!