पिंपळपानविविध व्यवसाय, कला, कारागिरी, आधुनिक ज्ञानशाखा व त्यांत होणारे मराठी भाषेचे उपयोजन यासंबंधीच्या प्रत्यक्ष चित्रिकरणावर आधारित ‘आकाशदीप’ व ‘पिंपळपान’ या दोन दृक-श्राव्य मालिकांची निर्मिती संस्थेने १९९४ साली डॉ. अशोक दा. रानडे व श्री. मुकुंद टाकसाळे यांच्या सहकार्याने केलेली होती. भाषासमृद्धीची दिशा सुचविणारी ही मालिका असून त्यातील ‘आकाशदीप’ या व्यक्तीविषयक कार्यक्रमात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंतराव गोवारीकर, वैद्य बालाजी तांबे, चितळे बंधु , इत्यादी अनेक मान्यवर सहभागी झाले होते. पिंपळपान या मालिकेत एखाद्या संकल्पनेच्या, विषयाच्या भोवतालचे भाषिक, सांस्कृतिक विश्व जिज्ञासूपणे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक अनवट विषयाचे दर्शन आपणाला यातून घडेल. या दृक-श्राव्य मालिकेचे सर्व अधिकार राज्य मराठी विकास संस्थेच्या अधीन असून त्यांचे हे भाग जनतेसाठी विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यांची नक्कल करून विक्री करणे, ते आपल्या संकेतस्थळावर घालणे इ. गोष्टी करणाऱ्या व्यक्ती वा संस्था आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पिंपळपान
सूचना : दृकश्राव्य मालिका डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या बटनावर जाऊन राइट क्लिक केल्यावर (Save Link As…) विकल्प निवडून Save या बटनावर क्लिक करा.

घण घण घंटाबाजाची पेटीभाषा नृत्याचीमराठी युद्धेमहाराष्ट्राचे अक्षरधनरात्र दिन आम्हाविसरलेले संगीतस्मृतीने पहाणे आता

This Post Has One Comment

  1. Raviraj phalle

    खूप छान उपक्रम आहे,अजूनही अनेक पुस्तके ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, ही विनंती आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!