रामविसंस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा भाषा विषयक पुस्तकांच्या निर्मितीस सहकार्य व्हावे म्हणून सदर योजना संस्था राबवित आहे.
निर्मितीखर्चाच्या ३५ टक्के इतके अनुदान साहाय्य करण्याचे निर्देश संस्थेला कार्यकारी समितीने दिलेले आहेत. यानुसार संस्था या योजनेची अंमलबजावणी करीत असते.

या योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये सिंधू संस्कृतीच्या लिपीचे वाचन व अध्ययन या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अनुदान देण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत सन २०२० साली ‘सिंधुदुर्गातील रानभाज्या’ या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले. ‘सिंधुदुर्गातील रानभाज्या’ या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अनुदान देणे हे संस्थेच्या उद्दिष्टांशी अनुरूप तसेच वनस्पतीशास्त्र आणि विज्ञान यांची सांगड घालणारे हे पुस्तक असल्याने या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यास कार्यकारी समितीने मान्यता दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगवणाऱ्या रानभाज्यांवरील पुस्तकाचा उपयोग विद्यार्थी, सर्वसामान्य वाचक, गृहिणी तसेच उपाहारगृहांचे चालक या सर्वांना होणार आहे.

जागतिक वृक्षदिनाचे औचित्य साधून दि. २७ सप्टेबर २०२० मध्ये पुस्तकाचे दापोली कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले असून कार्यकारी समितीच्या सूचनेननुसार सदर पुस्तकाची संगणकीय प्रत विनामूल्य स्वरूपात संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.