‘मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे’  उपक्रम सन २०२५ – २६

आवाहन

मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर परंतु देशांतर्गत मान्यता प्राप्त मराठी भाषा युवक मंडळांना अर्थसाहाय्य करणे हा उपक्रम  राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सन २०२४ पासून राबविण्यात येत आहे.

शासनामार्फत शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२३/प्र.क्र.२७/भाषा – ३, दि. १३ जुलै, २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासननिर्णयातील अटी-शर्तींना अनुसरुन पात्र मराठी भाषा युवक मंडळांना वार्षिक रु. १०,०००/- इतके अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पात्र मराठी भाषा युवक मंडळांकडून दिनांक  ०१/०१/२०२६ ते २०/०१/२०२६ या विहित कालावधीत व विहित नमुन्यात गुगल अर्ज मागविण्यात येत आहेत. या उपक्रमासंदर्भातील कार्यपद्धती व निकष, मराठी युवक मंडळे यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना,  इतर तपशील विहित नमुन्यात गुगल अर्ज (Google  Form) राज्य मराठी विकास संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in  या व महाराष्ट्र शासनाच्या  http://maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळांवर ‘नवीन संदेश’ या सदरात मराठी भाषा युवक मराठी मंडळे स्थापन करणे२०२५-२६  या  शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सदर अर्थसाहाय्याचे गुगल अर्जच्या (Google  Form)  विहित नमुन्यात व विहित कालावधीत दि. ०१/०१/२०२६ ते २०/०१/२०२६ पर्यत राज्य मराठी विकास संस्थेकडे सादर करणे बंधनकारक राहील. अंतिम तारखेच्या कालमर्यादेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे या युवक मंडळांचे मुख्य ध्येय असले तरी या मंडळांमध्ये अमराठी भाषक बांधवांनीही योगदान देणे अभिप्रेत आहे.

महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर परंतु देशांतर्गत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या मराठी भाषा युवक मंडळांना सदर उपक्रम/योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

 

‘मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे’  उपक्रम सन २०२५ – २६ – गुगल अर्ज येथे क्लिक करा.

 

खालील बटणावर क्लिक करून आवाहन, अटी व शर्तींबाबतची धारिका (File) व शासननिर्णय डाऊनलोड (Download) करावे.

आवाहन, अटी व शर्ती शासननिर्णय

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!