आपणच पुणे ही शिक्षणक्षेत्रात कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शैक्षणिक समस्यासंबंधी संशोधन पद्धतीने अभ्यास करणे हे तिच्य़ा विविध कार्यांपैकी महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी संस्थेच्या मा. अध्यक्षा डॉ. सुमनताई करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली २०१२ साली सुकाणू समिती स्थापन झाली.
या समितीने मुलांचा भाषा- विकास कसा होतो आणि त्यात पालक, शिक्षक आणि समाज यांचा कोणता वाटा असतो याचा अभ्यास करण्याच्या हेतूने “शिकू द्या मुलांना मराठी आनंदाने, प्रेमाने अन् अभिमानाने” हा प्रकल्प हाती घेतला गेला. यातील वस्तुस्थितीचे सादरीकरण दृक श्राव्य स्वरुपात केले गेले आहे. या प्रकल्पाच्या २०१२ -१४ मध्ये पार पडलेल्या पहिल्या भागात गर्भावस्थेपासून ते शैशवापर्यंत मुलांचा भाषाविकास कसा होतो ते दाखविले आहे.
“आपणच” च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (www.aapanach.org) त्याचाच पुढचा भाग राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. हा अभ्यास पुणे आणि सातारा जिल्ह्यातील १२ शाळांच्या सहकार्याने पूर्ण करण्य़ात आला आहे. यात जिल्हापरिषद, नगर/महानगर पालिकांच्या शाळा, खासगी शाळा यांचा समावेश आहे. आपणच या संस्थेने केलेल्या कामाचा अहवाल यूट्यूबवर उपलब्ध करण्यात आला आहे.