आवाहन

महाराष्ट्रातील मराठी भाषा व मराठी साहित्य या संदर्भात संशोधन करणाऱ्या मान्यताप्राप्त
संस्था / मंडळासाठी अर्थसाहाय्य योजना

 

महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील उद्दिष्ट क्र. १. – महाराष्ट्राची व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा या तिनही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविणे, उद्दिष्ट क्र. ४ शासनव्यवहाराच्या प्रशासन, कायदा, न्याय, जनसंपर्क अशा विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये मराठी भाषेचा लोकाभिमुख आणि सुलभ वापर वाढविण्यासाठी भाषिक उपक्रम हाती घेणे व उपकरणे निर्माण करणे. या उद्दिष्टांना अनुसरून राज्य मराठी विकास संस्थेमार्फत महाराष्ट्रातील मराठी भाषेसंदर्भात संशोधन करणारे संस्था / मंडळ यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सदर योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.    

महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा व मराठी साहित्य या संदर्भात दर्जेदार कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्था/ मंडळांना अर्थसाहाय्य देण्याच्या अनुषंगाने राज्य मराठी विकास संस्थेने, २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी संस्था/ मंडळांना अर्थसाहाय्य देण्यासाठी पात्र संस्था/ मंडळ यांनी दिनांक : ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत राज्य मराठी विकास संस्थेकडे गुगल अर्ज तसेच इ-मेलद्वारे मागविण्यात येत आहेत. विहित कालावधीनंतर येणाऱ्या अर्जांचा अर्थसाहाय्यासाठी विचार केला जाणार नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया
  • अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल.
  • प्रथमत: खाली दिलेल्या गुगल अर्ज बटनावर क्लिक करून गुगल अर्ज (Google Form) भरून जमा (Submit) करावा.
  • एम.एस.वर्डअर्ज (MS Word – Form) या बटनावर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करावा.
  • तो संगणकावर भरावा किंवा प्रिंट काढून लिखित स्वरूपात भरावा.
  • त्यानंतर भरलेला फक्त एम.एस.वर्डअर्ज (MS Word – Form) यादीतील सर्व कागदपत्रे स्कॅन करून एकाच पीडीएफ (pdf) मध्ये project4.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावीत.
अटी व शर्ती गुगल अर्ज एम.एस.वर्ड – अर्ज

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!