भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैवदप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात आले आहेत.

विविध कार्यक्रम

पुस्तकांचं गाव, भिलार

१)  शब्दजत्रा – भाषिक खेळ

पुस्तकांचं गाव प्रकल्प कार्यालय आणि हिलरेंज माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ऑगस्ट, २०२२ रोजी हिलरेंज माध्यमिक
विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘शब्दजत्रा – भाषिक खेळ’ (नाव, गाव, फळ, फुल) आणि ‘शब्दजत्रा – भाषिक खेळ’ (मराठी
शब्दहौशी) या  खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

  • शब्दजत्रा या खेळामधुन विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि शब्दसंग्रह वाढावा या उद्देशाने ‘शब्दजत्रा – भाषिक खेळ’ या खेळाचे आयोजन करण्यात आले.
  • या दोन्ही खेळात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचे एकूण १२० विद्यार्थी व ६ शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
  • या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवडण्यात आले.
  • विजेत्यांना राज्य मराठी विकास संस्थेची निवडक प्रकाशने व प्रकल्पाचे बोधचिन्ह असलेला मग बक्षिस स्वरुपात देण्यात आला.
  • क्षणचित्रे

२)  शब्दजत्रा – भाषिक खेळ

      पुस्तकांचं गाव प्रकल्प कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ऑगस्ट, २०२२ रोजी पुस्तकांचं गाव
प्रकल्प कार्यालय भिलार येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘शब्दजत्रा – भाषिक खेळ’ (नाव, गाव, फळ, फुल आणि शब्दहौशी) या खेळाचे
आयोजन करण्यात आले होते.

  • शब्दजत्रा या खेळामधुन विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि शब्दसंग्रह वाढावा या उद्देशाने ‘मराठी शब्दहौशी’ खेळाचे आयोजन करण्यात आले.
  • या खेळात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, भिलार एकूण २७ विद्यार्थी व ४ शिक्षक व मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला.
  • विजेत्यांना राज्य मराठी विकास संस्थेची निवडक प्रकाशने बक्षिस स्वरुपात देण्यात आले.
  • क्षणचित्रे

३)   ग्रंथदिंडी

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्प कार्यालय आणि ग्रामपंचायत भिलार, विविध महिला बचत गट यांच्या विद्यमाने दि. १२ ऑगस्ट, २०२२ रोजी भिलार येथे भागीरथी (विधवा) महिलांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पुजन व सुरुवात करण्यात आली.
  • प्रकल्प कार्यालय ते हनुमान मंदिर हॉल पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.
  • विशेष म्हणजे प्रथमत: गावातील भागीरथी (विधवा) महिलांनी ग्रंथदिंडीचे सारथ्य केले. या प्रसंगी भागीरथी महिला भावूक झाल्या होत्या. ग्रंथदिंडीमध्ये गावातील एकूण २०० ते २५० महिलांनी सहभाग नोंदवला.
  • क्षणचित्रे

अभिप्राय द्यायला विसरू नका!