मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२
कार्यक्रमांविषयी माहिती
मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालयांबरोबर शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढावा म्हणून  सन २०१३ पासून  शासन निर्णयान्वये दरवर्षी  “मराठी  भाषा  संवर्धन  पंधरवडा” साजरा  करण्याचा  निर्णय  घेण्यात  आला  आहे.  सन २०२१ पासून राज्यातील  सर्व  शासकीय/निमशासकीय  कार्यालये/महामंडळे, केंद्र  शासनाच्या  अखत्यारीतील  सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक  उपक्रम, सर्व  खाजगी  व  व्यापारी  बँका, सर्व  शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्याच्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण  देशात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सदर निर्बंध लक्षात घेता, या कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष  कार्यक्रम  करता  येणार  नसले  तरी, आधुनिक  तंत्रज्ञानाचा  उपयोग  करुन  जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रम साजरे करताना सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाणी इ. माध्यमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मराठीचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

अ) राज्यातील सर्व कार्यालयांनी करावयाचे कार्यक्रम :- ऑनलाईन कार्यक्रम ही कोविडच्या तथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज आहे. ही बाब विचारात घेता, मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी खालीलप्रमाणे जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरे करण्यात यावेत. (जिथे प्रत्यक्षरीत्या कार्यक्रम करणे शक्य आहे, तिथे केंद्र शासन/राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे)

१) मराठी भाषेसंबंधी, वाङ्मयासंबंधी विविध परिसंवाद / व्याख्याने / कार्यशाळा / शिबीरे / कविसंमेलने / एकांकिका / बालनाट्ये / नाटके / पुस्तक प्रकाशन समारंभ/ साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन करणे.

२) मराठी भाषेत निबंध / प्रश्नमंजुषा / कथाकथन / चारोळीलेखन / कथालेखन / कवितालेखन / हस्ताक्षर / शुद्धलेखन / वक्तृत्व / घोषवाक्ये / अभिवाचन / वादविवाद / अंताक्षरी / शब्दकोडी / मराठी साहित्यासंबंधी पुस्तकांचे रसग्रहण / समीक्षण / परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे.

३) मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ज्ञ नामवंत व्यक्ती / लेखक / वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करणे.

४) ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट  इत्यादी  साहित्यिक  व  सांस्कृतिक कार्यक्रम करणे.

५) वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषिक व्यक्तींचा सत्कार, मुलाखती घेणे.

६) राज्यातील  अमराठी  भाषकांना  मराठी  भाषेचा  सुलभ  पद्धतीने  परिचय  करुन  देण्याच्या  दृष्टीने कार्यशाळा/ भाषेसंबंधी स्पर्धांचे आयोजन करणे.

७) मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ.एम.रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप इ. आधुनिक प्रसार माध्यमातून याबाबतचे दृक-श्राव्य संदेश प्रसारित करावेत.

८) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन यासाठी विविध मार्गांनी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव/ सत्कार करणे.

९) टंकलेखनाकरिता युनिकोड मराठीचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२

कार्यक्रम

(१४ ते २८ जानेवारी २०२२, वेळ – सायं. ४ वाजता)

कार्यक्रमांचे दुवे
दिनांक विषय दुवे
१४ जानेवारी साहित्य सेतू
भाग १ – मराठी भाषेला अभिजात दर्जा
१५ जानेवारी साहित्य सेतू
भाग २ – कविवर्य वसंत बापट यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम
१६ जानेवारी साहित्य सेतू
भाग ३ – कथा
१७ जानेवारी साहित्य सेतू
भाग ४ – कादंबरी
१८ जानेवारी साहित्य सेतू
भाग ५ – कविता
१९ जानेवारी साहित्य सेतू
भाग ६ – नाटक
२० जानेवारी साहित्य सेतू
भाग ७ – ललित लेख
२१ जानेवारी साहित्य सेतू
भाग ८ – लोकसाहित्य
२२ जानेवारी साहित्य सेतू
भाग ९ – प्रवासवर्णन
२३ जानेवारी साहित्य सेतू
भाग १० – विनोदी साहित्य
२४ जानेवारी साहित्य सेतू
भाग ११ – बाल साहित्य
२५ जानेवारी साहित्य सेतू
भाग १२ – रहस्यमय साहित्य
२६ जानेवारी साहित्य सेतू
भाग १३ – ऐतिहासिक साहित्य
२७ जानेवारी साहित्य सेतू
भाग १४ –
२८ जानेवारी साहित्य सेतू
भाग १५ –

अभिप्राय द्यायला विसरू नका!