मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा व निबंध स्पर्धा

बृहन्महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी भाषकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक जाणिवेत वृद्धी व्हावी, त्यांना मराठी भाषा साहित्य यांची गोडी लागावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दिल्ली येथील मध्यवर्ती संघटनेमार्फंत गेल्या ३० वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी भाषा, संस्कृती व सामान्य ज्ञान परीक्षा आणि निबंध स्पर्धेचे सन २०१८ पासून राज्य मराठी विकास संस्थेने बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दिल्ली या संस्थेबरोबर संयुक्त आयोजन करण्याचे ठरवले. या परीक्षेचे व्याप्ती व महत्त्व वाढावे, बृहन्महाराष्ट्रातील  अनेक शहरांतील मराठी तसेच मराठी शिकू इच्छिणाऱ्या इतरेजनांनीही या परीक्षेत सहभाग घ्यावा हा त्यामागील मुख्य हेतू आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या विहित कार्यपद्धतीनुसार प्रकल्प-वित्त व कार्यकारी समितीने मान्यता दिलेली आहे.

सन २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परीक्षेचे भारतातील ५१ केंद्रांवर आयोजन केले गेले व त्यात १९५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ ३० जून २०१९ रोजी अजमेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

 २०१९-२० साली २६ जानेवारी २०२० रोजी मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धा विविध राज्यांतील एकूण ३२ केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या. यांत महाराष्ट्र मंडळ, अजमेर हे नवे केंद्र सुरू झाले. मराठी परीक्षेत ८७४  व निबंध स्पर्धेत ८७३ असे एकूण १७४७ परीक्षार्थी व निबंध स्पर्धक सहभागी झाले  होते.

२०२०-२१ या कालावधीत कोविड १९ च्या प्रादूर्भावामुळे अद्याप या परीक्षा व स्पर्धाचे आयोजन करणे शक्य झालेले नाही. तथापि यासंदर्भात पूर्वतयारी सुरु असून परिस्थितीत सुधारणा झाल्यावर आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!