राज्य मराठी विकास संस्था(मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन) आणि मिती क्रिएशन्स यांचा संयुक्त विद्यमाने वसा वाचनाचा – दोन दिवसीय डिजिटल चर्चासत्र आणि कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
१५ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपल्या वाचनाच्या प्रवासात ज्या लेखांनी आपल्याला समृद्ध केलं अशा लेखांचं अभिवाचन करूया आणि हे साहित्य अनेकांपर्यंत पोहोचवूया.
चला तर मग, वाचनाचा प्रचार प्रसार करत वाचन चळवळीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊया…
डिजिटल चर्चासत्र विषय –
परिसंवाद १ – वाचन संस्कृती – काल, आज, उद्या. YouTube Link
परिसंवाद २ – मनोरंजन क्षेत्रातील वाचनाचे महत्व. YouTube Link
कविता वाचन स्पर्धेचा विषय – मराठी साहित्यातील कथा – YouTube Link
This slideshow requires JavaScript.
क्र. | दिनांक | कार्यक्रम |
१ | ११ ऑक्टोबर २०२२ | १) अभिवाचन – ‘गावातील महिलांचे अभिवाचन’
२) शब्दजत्रा – भाषिक खेळ (मराठी शब्दहौशी, शब्द साखळी) |
२ | १२ ऑक्टोबर २०२२ | १) शब्दजत्रा – भाषिक खेळ (पुस्तक शोध) |
३ | १३ ऑक्टोबर २०२२ | १) अभिवाचन – ‘दालन चालक (पुरुष) अभिवाचन’
२) शब्दजत्रा – भाषिक खेळ (मराठी शब्दहौशी, नाव-गाव-फळ-फुल, शब्द साखळी) |
४ | १४ ऑक्टोबर २०२२ | १) अभिवाचन – ‘कथा वाचन’ |
५ | १५ ऑक्टोबर २०२२ | १) ‘वाचनसंस्कृती’ – व्याख्यान
|
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या दृष्ट्टीने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था / मंडळ, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दींगत करण्याच्या दृष्ट्टीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी राज्य मराठी विकास संस्था(मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन) आणि मिती क्रिएशन्स आयोजित अक्षरधारा – डिजिटल अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
१५ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपल्या वाचनाच्या प्रवासात ज्या ललितलेखांनी आपल्याला समृद्ध केलं अशा लेखांचं अभिवाचन करूया आणि हे साहित्य अनेकांपर्यंत पोहोचवूया.
चला तर मग, वाचनाचा प्रचार प्रसार करत वाचन चळवळीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊया…
विषय – मराठी साहित्यातील ललित लेखन
नियम आणि अटी –
• मराठी साहित्यातील निवडक ललित लेखाचं अभिवाचन करतानाचा आपला ५ मिनिटाचा व्हिडीओ स्पर्धकांनी abhivachan.miti@gmail.com या इमेल वर पाठवावा.
• हि स्पर्धा ३ गटात होईल. स्पर्धेचे ३ गट –
– गट क्र. १ : वयोगट ५ ते १५
– गट क्र. २ : वयोगट १५ ते ३०
– गट क्र. ३ : वयोगट ३० वर्ष आणि पुढे
• व्हिडीओ पाठवताना आपलं संपूर्ण नाव, ठिकाण, फोन नंबर आणि स्पर्धेचा गट ही सर्व माहिती मेल मध्ये नमूद करावी.
(स्पर्धकांनी या माहितीशिवाय मेल पाठवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत)
• व्हिडीओ करताना फोन आडवा धरावा. अभिवाचन सुरु करण्याआधी आपलं नाव सांगावं आणि तुम्ही जे अभिवाचन करणार आहात त्या कलाकृतीचंही नाव सांगावं.
• व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख – १० ऑक्टोबर
• बक्षिसांचं स्वरूप रोख रक्कम, प्रशस्ती पत्रक आणि पुस्तकं असं असेल.
• विजेत्या स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ कार्यक्रमात वापरले जातील आणि इतर काही निवडक स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर, मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर, तसंच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करू.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९९३०११५७५९
यावर्षी राज्य मराठी विकास संस्था(मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन) व माहिती आणि जनसंपर्क महसंचालनालय यांच्या संयु्क्त विद्यमाने व्हिजन व्हाईस ॲक्ट यांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम दिनांक १५ व १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी विविध ऑनलाइन माध्यमांतून प्रसारित होणार आहे.
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या दृष्ट्टीने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था / मंडळ, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दींगत करण्याच्या दृष्ट्टीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी राज्य मराठी विकास संस्था(मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन) व माहिती आणि जनसंपर्क महसंचालनालय यांच्या संयु्क्त विद्यमाने अभिनव कल्याण यांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम दिनांक १५ व १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी विविध ऑनलाइन माध्यमांतून प्रसारित होणार आहे.
आपल्या द्वारे केले जाणारे हे कार्य मोलाचे व सर्वोत्कृष्ट आहे असेच कार्य पुढेही सुरू राहावे.