संगणकावर मराठीचा वापर करण्यासाठी देवनागरी टंकांचा वापर अपरिहार्यपणे होत असला तरी देवनागरी टंकांबाबतचे तांत्रिक ज्ञान अनेकांना नसल्याने अनेकदा काही समस्या निर्माण होत असतात.

देवनागरी टंकांविषयीची तांत्रिक जाण वाढावी ह्यासाठी देवनागरीची मुद्रणपरंपरा, त्यामुळे निर्माण होणारी काही वैशिष्ट्ये, देवनागरी अक्षराकारांची रचनावैशिष्ट्ये, देवनागरी टंकांची रचनावैशिष्ट्ये, टंकांचे प्रकार, टंकांचा वापर करताना लक्षात घ्यावयाची तत्त्वे, टंक वापरणाऱ्यांना साहाय्यभूत ठरतील असे टंकरचनेच्या प्रक्रियेतील काही मुद्दे, टंकांसंदर्भातील विविध अडचणी व त्यांच्या सोडवणुकीचे उपाय, काही समस्या, देवनागरी टंकरचनाकारांची माहिती, देवनागरी टंकांबाबत वापरकर्त्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याने देवनागरी टंकांविषयीची जाण असलेले एक पुस्तक तयार करणे हा संस्थेचा उद्देश आहे.

यासंदर्भात डॉ. गिरीश दळवी यांना देवनागरी टंकांविषयी पुस्तक तयार करण्याचे दायित्व सोपविण्यात आले आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!