महाराष्ट्रात बऱ्याच संस्था खास मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संशोधनासाठी स्थापन झाल्या आहेत. मात्र निधीअभावी या संस्थांचे काम थंडावते आहे. मराठीसाठी काम करण्याचा उत्साह आहे, नवनव्या कल्पना आहेत मात्र निधीअभावी ते पूर्ण करता येत नाही, अशी कैफियत मराठीच्या कार्यकर्त्यांनी माजी मराठी भाषा मंत्री मा.ना श्री. विनोद तावडे यांच्या कानी घातली होती. त्यावर उपाययोजना करताना, ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार नोंदणीकृत मराठी संस्थांना आपल्या विविध संशोधन प्रकल्पांसाठी जास्तीतजास्त रु.५ लाख इतके अर्थसाहाय्य करण्यात येते.

अभिप्राय द्यायला विसरू नका!