कवी दासोपंत यांची ‘गीताटीका’ म्हणजेच ‘गीतार्णव’ हा ग्रंथ होय. या ग्रंथाचे १८ अध्याय असून त्यामध्ये १ लाख २५ हजार ओव्या आहेत. एवढी विस्तृत गीताटीका मराठी भाषेत दुसरी नाही. या ग्रंथात ‘गीतेच्या श्लोकांवर’ दासोपंत यांनी स्वयंप्रज्ञेने भाष्य (विवेचन) व परमार्थ निरूपण ही मुख्य विषयभूमिका स्वीकारून गीतेच्या श्लोकांच्या निरूपणात रूढार्थातून निराळे अर्थ दिलेले आहेत.
या महत्त्वपूर्ण ग्रंथातून आलेल्या तत्कालीन (मध्ययुगीन) मराठी भाषेचा आकारविल्ह्यानुसार शब्दार्थ संदर्भकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. गीतार्णव या साहित्यकृतीतील मराठी भाषेचे आणि मराठी साहित्याचे मध्ययुगीन कालखंडातील भाषिक वैभव मराठी भाषिकांना कळावे व अभ्यासकांना त्याचा उपयोग व्हावा. तसेच हा ग्रंथ साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यासकांना समजून घेताना अडचण येऊ नये हा या प्रकल्पामागील हेतू आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!