वाराणसी (बनारस) येथील मराठी भाषेचा सांस्कृतिक व समाजभाषा वैज्ञानिक अभ्यास

भारतातील इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जेथे मराठी समाज आहे, त्यांचा सांस्कृतिक व समाजभाषावैज्ञानिक अभ्यास करून त्यांची भाषा व संस्कृती यांच्या सद्यस्थितीचा संशोधनात्मक आढावा घेऊन त्या माहितीचा उपयोग बहुउद्देशीय पद्धतीने करणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

या प्रकल्पांतर्गत वाराणसी येथे बोलली जाणारी मराठी भाषा व प्रमाण मराठी भाषा यांतील फरकाचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास करणे अपेक्षित असून, वाराणसीमधील भाषिकांची प्राथमिक पाहणी, भाषिकांची एकूण संख्या, स्त्री-पुरुष, वयोगटाप्रमाणे (लोकसंख्या) इ. माहिती मिळवणे, काही निवडक भाषकांच्या भाषिक नमुन्यांचे ध्वनिमुद्रण करणे, येथील मराठी भाषकांशी संपर्क साधून ठरविलेली संशोधनाची साधने वापरून भाषिक नमुने व माहिती मिळवणे, गोळा केलेल्या भाषिक नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण करणे, सर्व संकलित माहितीचे मराठीत लेखन करून मांडणी करण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाचा अहवाल संस्थेस प्राप्त झाला असून त्यावर तज्ज्ञांचे अभिप्राय घेण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या सूचनांप्रमाणे काम अद्ययावत करण्याची कार्यवाही चालू आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!