सूचना

पुस्तकांचे गाव या प्रकल्पांतर्गत भिलार, जि. सातारा येथील दालनांसाठी पुस्तक खरेदीसाठी दरपत्रके मागविण्याबाबतची सूचना.

पुस्तकांचं गाव भिलार येथील दालनांमध्ये ठेवण्यासाठी उपरोक्त दिलेल्या साहित्यप्रकारांनसुार पुस्तक खरेदी निधीच्या उपलब्धतेनुसार करावयाची आहेत. त्याकरिता पुस्तक पुरवठादारांकडून दरपत्रके मागवून खरेदी प्रक्रीया राबवायची आहे. खालील नमून्यात पुस्तक सवलत दर सादर करण्यात यावेत.

अ.क्र. पुस्तकांची संख्या भाषा पुस्तकांच्या मूळ छापील किंमतीवर देण्यात येणारी सवलत (टक्केवारीत)
ठोक संख्या  –   ५०००

(अंदाजित)

मराठी  
प्रती पुस्तक प्लॅस्टिक कव्हर लावण्यासाठीचा दर    

सदर संबंधित /पुस्तके विक्रेत्यांकडून, वितरकांकडून, प्रकाशन संस्था, लेखक, कवी यांच्याकडून राज्य मराठी विकास संस्थेच्या पुस्तकांचे गाव या प्रकल्पांतर्गत असणाऱ्या दालनांकरता किती कमाल सवलत दर देऊ शकतील, याबाबतचे दरपत्रक/निविदा मागविण्यात येत आहेत.

अटी, शर्ती व दरपत्रकांचा नमुना सोबत जोडला आहे. त्याच नमुन्यात दरपत्रक सादर करावे. दरपत्रके दिनांक १३.०२.२०२६ रोजी दुपारी ०२ वाजेपर्यंत या कार्यालयास प्राप्त होतील अशा प्रकारे पाठवावी. दरपत्रक स्वीकारणे वा कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर नाकारणे हे सर्व अधिकार मा. संचालक, राज्य मराठी विकास संस्था यांना राहतील. सविस्तर माहितीसाठी खालील सूचना पहावी.

नोटीस/नमूना/अटी व शर्ती (पुगाभि)

अभिप्राय द्यायला विसरू नका!