शं. ग. दाते यांनी १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची दोन भागांत तयार केली होती. ही सूची बरीच वर्षे अनुपलब्ध असल्याने तिचे नवीन परिशिष्टांसह पुनर्मुद्रण संस्थेने केले. इ. स. १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची उपलब्ध नसल्याने राज्य मराठी विकास संस्थेने ‘मराठी ग्रंथसूचिमाला ‘ हा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत इ. स. १९५१ ते २००० या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्यात येत आहे. आतापर्यत या मालेतील चार भाग — भाग ३ (१९५१-१९६२), भाग ४ (१९६३-१९७०), भाग ५ (१९७१-१९७८) आणि भाग ६ (१९७९-१९८५) — प्रकाशित करण्यात आले आहेत. इ. स. २००० पर्यंतच्या कालखंडातील ग्रंथांची नोंद करणाऱ्या पुढील भागांचे काम चालू आहे.