कोकणात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे चिपळूण शहराचं अभूतपूर्व झाल्याचं पाहायला मिळालं. याच महापुराच्या संकटामुळे १८६४ साली स्थापन झालेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील पुस्तकांचं, ग्रंथसंपदेचं प्रचंड नुकसान झालं होत. परंतु, आता या वाचनालयासाठी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासाठी मोठी ग्रंथसंपदा रवाना करण्यात आली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रवाना करण्यात आलं आहे.

अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात महापुराचं पाणी शिरल्याने १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील पुस्तकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हे नुकसान विचारात घेऊनअनेक वर्षाची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी, वाचकांना पुन्हा वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडीत राहावी या हेतूने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील तब्बल अडीच हजार पुस्तक भेट देण्यात  येत असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

 

This Post Has One Comment

  1. PRITESH SONONE

    खूप छान .. आभार

अभिप्राय द्यायला विसरू नका!