राज्य मराठी विकास संस्था आणि  मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा  

स्पर्धेविषयी माहिती

राज्य मराठी विकास संस्था आणि  मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा  

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने राज्य मराठी विकास संस्था आणि  मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटिंगद्वारे दि. ३ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन राज्य मराठी विकास संस्थाअंकनाद यांच्या फेसबुक पेज वर लाईव्ह दिसणार आहे.

पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही पाढे पाठांतर स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे.

जिल्हा पातळी, विभाग पातळी व राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेण्यात येणार असली तरी पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना खुली आहे.  स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियोजन :

जिल्हा पातळीवर : विद्यार्थ्यानी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडीओ क्लिप मेलवर पाठवतील. जिल्हास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्याना त्या त्या गटातील इयत्ताचा अंकनाद सेट बक्षीस देण्यात येईल.

राज्य पातळीवर : विभागनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पाढ्यांवर आधारित गणितीय आकडेमोड यावर परीक्षण करण्यात येईल.

 प्रवेश ,सहभाग आणि पारितोषिके 

जिल्हा पातळी : प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन

राज्य पातळी : प्रत्येक विभागातील पहिल्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यातून प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक बक्षीस व मानचिन्ह देण्यात येईल.

जिल्हा पातळीवर विद्यार्थ्याचा दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडीओ अपलोड करावा लागेल.

स्पर्धेची नोंदणी आणि स्पर्धेविषयी अधिक माहितीकरिता www.mahaaanknaad.com या संकेतस्थळावर भेट द्या.

स्पर्धेचे विषय

स्पर्धेचे विषय

गट विषय
१. बालगट (वयोगट – ४ ते ६) अंक उच्चार १ ते १००
२. इयत्ता दुसरी – तिसरी १ ते १० पाढे, ११ ते २० पाढे, २१ ते ३० पाढे
३. इयत्ता चौथी – पाचवी पावकी, निमकी
४. इयत्ता सहावी – सातवी पाऊणकी, सवायकी
५. इयत्ता आठवी – नववी – दहावी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे
६. खुला गट पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे

पहिली राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा - विजेते

स्पर्धेचे विजेते

🎀 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, मनःपूर्वक शुभेच्छा❢ 🎀

This slideshow requires JavaScript.

द्वितीय राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा - विजेते

स्पर्धेचे विजेते

🎀 सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, मनःपूर्वक शुभेच्छा❢ 🎀

द्वितीय राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा - विजेते

अभिप्राय द्यायला विसरू नका!