या प्रकल्पांतर्गत मराठीतील प्रसिद्ध निवडक संतसाहित्य तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांचे साहित्य, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्य व महाराष्ट्र शासन पारितोषिक विजेते निवडक साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके तयार करण्यात येणार असून, आतापर्यंत कृष्णाकाठ (स्व. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र) व श्री दासबोध (श्री समर्थ रामदास) या ग्रंथांची श्राव्य पुस्तके तयार करण्यात आली आहेत.

ही पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरून जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या ऑडिओ सीडीही संस्थेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांचे अनुक्रमे रसयात्रा व प्रवासी पक्षी तसेच संहिता आणि आदिमाया ह्या कवितासंग्रहांची श्राव्य पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहेत.

सर्व श्राव्य पुस्तके पहाण्यासाठी इथे क्लिक करा >>

अभिप्राय द्यायला विसरू नका!