ऑलिम्पिक या स्पर्धेविषयी, त्यातील खेळांविषयीची समग्र माहिती उपलब्ध करून देणारा अद्ययावत कोश मराठीत नाही. तसा माहितीकोश ई-बुक स्वरूपात तयार करण्याचा प्रकल्प आकारास येत आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई व ज्ञानप्रबोधिनी केंद्र, निगडी या दोन संस्थामध्ये ऑलिम्पिक माहितीकोश प्रकल्पाचे चालू आहे.
ऑलिम्पिक माहितीकोश शाळा, महाविद्यालय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा संघटना, खेळाडू यांना या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबद्दलची माहिती एकत्रित प्राप्त व्हावी तसेच ऑलिम्पिक खेळाविषयी माहिती देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ऑलिम्पिक माहितीकोशाचे पुढीलप्रमाणे एकूण पाच खंड प्रस्तावित आहेत :
खंड १ : प्राचीन ऑलिम्पिक ओळख
खंड २ : ऑलिम्पिक स्पर्धानिहाय शहरे
खंड ३ : ऑलिम्पिकमधील खेळ
खंड ४ : खेळ आणि क्रिडाप्रकारातील विजेते
खंड ५ : ऑलिम्पिकचे सप्तरंग