पुस्तकांचं गाव, भिलार येथे प्रकल्पातील सहभागी विविध दालनांच्या भिंतींवर वेगवेगळ्या साहित्यप्रकारांनुसार चित्रकाम करण्यात आले होते. या विविध ३५ दालनांच्या भिंतींवर रंगकाम व चित्रकाम करणे तसेच पुस्तकांचं गाव भिलार येथील स्वागत कमान रंगकाम, चित्रकाम करणे प्रस्तावित आहे. याकरिता राज्य मराठी विकास संस्था विविध इच्छुक पुरवठादार /संस्था/ महाविद्यालय यांच्याकडून सोबत जोडलेल्या नोटीस मध्ये नमूद केलेल्या कामांच्या स्वरूपानुसार अंदाजदरपत्रके मागवित आहे.  इच्छुक पुरवठादार /संस्था/ महाविद्यालय  यांनी सदर अंदाजदरपत्रके राज्य मराठी विकास संस्था कार्यालय, मुंबई व पुस्तकांचं गाव, प्रकल्प कार्यालय, कृषीकांचन भिलार येथे दिनांक १३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सायं. ५.०० वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करावीत, अथवा राज्य मराठी विकास संस्थेच्या इ-पत्त्यावर rmvs_mumbai@yahoo.com वर पाठवावित. त्यानंतर आलेल्या अंदाजदरपत्रकांचा विचार करण्यात येणार नाही. शासकीय संस्था, शासकीय महाविद्यालय यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

नोटिस

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!