राज्य मराठी विकास संस्था

(महाराष्ट्र शासन पुरस्कृत)

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग,

धोबीतलाव, मुंबई – ४००००१ दूरध्वनी : (०२२) २२६३१३२५ / २२६५३९ ६६

इ-टपाल : rmvsmumbai@gmail.com; rmvs_mumbai@yahoo.com

इ-निविदा सुचना क्र. १/२०२१

खालील कामासाठी राज्य मराठी विकास संस्था संगीत क्षेत्रातील नामवंत संगीतकार/संस्था

यांच्याकडून मोहोरबंद निविदा मागवित आहे.

अ.क्र. कामाचा तपशील कामाची अंदाजित रक्कम निविदेची किंमत बयाणा रक्कम विधिग्राह्य कालावधी
ज्ञानेश्वर या ग्रंथाचे श्राव्यपुस्तक तयार करण्यासाठी महाजालाद्वारे (ऑनलाईन) निविदा मागविण्यात येत आहे. रु.९० लक्ष रु.१५,०००/- रु. १.५० लक्ष ९० दिवस
 

निविदा सूचना व निविदा प्रपत्र महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर   दि. ०९ / ०२ / २०२१ ते दि. २३ /०२/ २०२१ संध्याकाळी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. निविदा इच्छकांसाठी सविस्तर माहिती संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या संकेतस्थळावर अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निविदेच्या ऑनलाईन फॉमेची किंमत रु. १५०००/- तसेच इसारा रक्कम रु.१.५० लक्ष इतकी राहील.

सुचना :- वरील कामाकरिता राज्य मराठी विकास संस्थेद्वारे संगीत क्षेत्रातील नामवंत संगीतकार/संस्था यांच्याकडून दि. ०९/०२/२०२१ ते दि. २३/०२/२०२१ या कालावधीत निविदा क्र. 2021_MBVMS_645350_1 नुसार मोहोरबंद इ-निविदा मागविण्यात आल्या होत्या. तथापि दि. २३/०२/२०२१ अखेर फक्त एक निविदा प्राप्त झाली असल्यामुळे सदर इ-निविदेचा कालावधी दि. २४/०२/२०२१ पासून ०५/०३/२०२१ पर्यंत १० दिवसांसाठी वाढविण्यात येत आहे.

इ-निविदा माहिती [ pdf ]
वृत्तपत्र जाहिरात – दि. ०९ फेब्रुवारी २०२१ ( दै. पुढारी , Indian Express)

 

अभिप्राय द्यायला विसरू नका!